कृ. उ. बा. स च्या प्रशासकीय मंडळावर रणजित पा.हिवराळे यांची नियुक्ती.

नायगाव: ता प्रतिनिधी


कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर रणजित पा.हिवराळे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून सदर निवडीचे नियुक्ती पत्र दिल्याने हिवराळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


पणन संचालक, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडी बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाची नुकतीच निवड करण्यात आली असून यामध्ये मौजे कोळगाव ता.बिलोली येथील युवा नेते रणजित गंगाधरराव हिवराळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची कृ.उ.बा.स.मंडळावर नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल एम.डी.आर.टी(आमेरीका) विमा प्रतिनिधी आन्नासाहेब पाटील पवार, नगरसेवक पांडुरंग पाटील चव्हाण, संजय पाटील चव्हाण, छावा तालुकाध्यक्ष प्रताप पाटील सोमठानकर, दत्ता पाटील नारे, पत्रकार राजु पाटील शिंदे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष माधव पा. चव्हाण यांच्यासह सर्व मित्र परिवाराच्या वतीने आभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *