दिव्यांगासाठी रँम्प देणाऱ्या शेख दस्तगीर यांचे केले कौतुक
कंधार ; प्रतिनिधी
तहसील कार्यालय कंधार येथे सुंदर माझे कार्यालय अभियाना अंतर्गत दिव्यांगासाठी विविध योजना राबविल्या जात असून संजय गाधी निराधार असो अथवा दिव्यांगाना अडीअडचणी सांगण्यासाठी थेट कार्यालयात संपर्क साधता यावा म्हणून दिव्यांगासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या असल्याची माहीती नायब तहसिलदार तथा नगरपालीकेचे प्रभारी मुख्याधिकारी विजय चव्हाण यांनी आज दि.22 मार्च रोजी दिली.दिव्यांगासाठी रँम्प देणाऱ्या शेख दस्तगीर यांचे केले कौतुक केले.
नांदेड जिल्ह्यामध्ये सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत लोकसहभागातून सुजान नागरीकांनी भेट अथवा मदत करण्याचे आव्हान केले आहे.दि.22 मार्च रोजी तहसिल कार्यालय येथे दिव्यांगासाठी बांधवाण्यात आलेल्या रँपचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी नायब तहसिलदार बोलत होते.
कंधार तालुक्यामध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक तहसील कार्यालय कंधार येथे नेहमी येत असतात.व तसेच दिव्यांग बांधव सुद्धा या विभागाला नेहमी भेट देत असतात . ज्येष्ठ नागरिकांना होणारा गुडघ्या मधला त्रास व तसेच दिव्यांग बांधवासाठी चढण्यास आणि उतरण्यास होणारा त्रास शेख दस्तगीर छोटू मिया यांनी नेहमी पाहिला.स्वतः शेख दस्तगीर दिव्यांग असल्यामुळे त्यांना या त्रासाचा अनुभव होता म्हणून त्यांनी सुंदर माझे कार्यालय या उपक्रमास एक आगळीवेगळी भेट देण्याचा निर्णय घेतला.
यासंबंधी ग्रामपंचायत कार्यालय बहादरपुरा चे खंबीर नेतृत्व सचिन पाटील पेटकर यांच्याशी चर्चा करून दिव्यांग बांधवांसाठी रँम्प तहसील कार्यालय कंधार येथे उभारून दिला आहे.