बिलोली ता.प्र.
निसर्ग व सजिवसृष्टीचे अस्तित्व आबादीत ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धन हि काळाची गरज आसल्याचे मत देगलुर वनपरीक्षेञ अधिकारी चंद्रकांत पोतुलवार यानी दि.२१ मार्च रोजी बिलोली वन परीमंडळाच्या वतिने आयोजित जागतीक वन दिना निमित्त बिलोली येथे वन पर्यटन परीसरात वृक्षारोपन कार्यक्रमांचे दिप प्रज्वलीत प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
बिलोली शहरालगच्या दत्त मंदिर टेकडी भागातील वन पर्यटन परीसरात आज दि.२१ मार्च रविवार रोजी जागतिक वन दिना निमित्त देगलुर वनपरीक्षेञ अधिकारी चद्रकांत पोतुलवार यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.यावेळी त्यानी उपस्थिताना आपल्या मार्गदर्शनातुन वृक्षाचे पर्यावरणा विषयी सजिवसृष्टीचे महत्व आणी वन संवर्धन या बाबत मार्गदर्शन केले.या वेळी वनपाल फरीद शेख, शंकरराव गेडाम वनरक्षक गिरीष कुरुडे, लक्ष्मणराव शिंदे,गजानन कोतलवार,आशा गायकवाड ,वनमजुर मारोती इबितदार शेख पाशा ,इंगळे यांच्यासह पञकारांची उपस्थिती होती.