बिलोली नगर परिषदेच्या आवरात उभारणार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी यांनी जाहीर केला 71 हजाराचा निधी

बिलोली ता.प्र
बिलोली येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्यासाठी आज झालेल्या बैठकीत नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी यांनी 71 हजाराचा निधी जाहीर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या साठी हातभार लावला असून माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या कांही विविध प्रतिष्ठित मित्रांनी मिळून 90 हजार निधी देणार असल्याचे जाहीर केले.तर मारोती पटाईत यांनी 21 हजार रुपये निधी दिला आहे

.समाज मंदिरात झालेल्या बैठकीत महिला मंडळाच्या वतीने सौ.मैथिली संतोष कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रभारी नगराध्यक्ष मारोती दादा पटाईत ,मा. नगराध्यक्ष नागनाथ तुमोड, भिमराव जेट्ठे,सेवानिवृत्त तलाठी माधव जाधव, नगरसेवक अरुण उप्पलवार,नितीन देशमुख ,महेंद्र गायकवाड,यांची प्रमुख उपस्थिती होती.या निधी संकलन बैठकीचे आयोजन नगरसेवक प्रकाश पोवाडे, सामाजिक युवा कार्यकर्ते मुन्ना पोवाडे,गंगाधर सोनकांबळे, व जयंती मंडळ,महिला मंडळ यांनी केले होते.बिलोली नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमीपूजन झाले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी गेल्या अनेक, वर्षांपासून आंबेडकरी अनुयायी धडपडत होते.मात्र माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या पुढाकारातून बिलोलीकरांचे हे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *