गांधी समजून घेताना’ पुस्तकासाठी डॉ. जगदीश कदम यांना सह्याद्री साहित्य पुरस्कार जाहीर

नांदेड दि.१२- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी लिहिलेल्या ‘गांधी समजून घेताना’ या पुस्तकाला पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सह्याद्री साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले,राजेंद्र वाघ,सुरेश कंक,रंगनाथ गोडगे पाटील यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे.


नांदेड येथील संगत प्रकाशनाने ‘गांधी समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुणे येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *