पाणी हेच जीवन आहे…

जागतिक जल दिन

जागतिक कीर्तीचे जलतज्ञ स्टाॅकहोम जल पुरस्काराचे विजेते डाॅ.माधवराव चितळे यांनी”जागतिक जल दिन”करण्यात यावा हा प्रश्न सर्वप्रथम जागतिक मंचावर मांडला.त्यावेळी भरपूर चर्चा होउन २२मार्च हा दिवस “जागतिक जल दिन” म्हणून साजरा करण्याचे ठरले.२२मार्च या दिवसाचे वैशिष्ट्ये असे की,दरवर्षी पावसाळा सुरु होण्यासाठी २२मार्च पासुन वातावरणातबदल व्हायला सूरुवात होतात.त्यामूळे हा दिवस खूप विचारपूर्वक निवडण्यात आला.
सध्यास्थितीमध्ये आपल्या भारतात भुजलाचा उपसा भरमसाठ वाढला आहे.त्यामूळे भुजलपातळी वेगाने घसरत आहे.त्यासाठी कृत्रिम पध्दतीने जलसाठे कसे वाढविता येतील याचा गंभिरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.त्यासाठी पाण्याचे वेळीच नियोजन करणे फारच आवश्यक आहे.तसेच दहिहंडी,होळी,धुळवड आदि सणांमध्ये पाण्याचा वापर शक्यतो टाळावा.घराघरातून किचन,बाथरुम आणि बेसिनमधून वाया जाणा-या पाण्याचं शुध्दिकरण करुन त्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा बसवून घ्यावी,धुणी,भांडी करणा-या व्यक्तीने नळ जास्त वेळ चालू राहिल याची दक्षता घेणे आवश्यक आहे.आंघोळीसाठी शाॅवरचा वापर करणे टाळावे.


गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान बदल, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग या विविध कारणांमुळे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खाली गेली असून, नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे स्वच्छ पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवु लागली आहे. वाढती लोकसंख्या, कृषी आणि औद्योगिक क्षेत्राची वाढती गरज लक्षात घेउन यावर वेळीच उपाययोजना करून पाण्याची बचत करण्याची हीच योग्य वेळ आहे.सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या भीषण संकटाशी धैर्याने मुकाबला करीत आहे. सामाजिक आरोग्य धोक्यात आलेले असतांना पाण्याची टंचाईदेखील आपल्यासमोर उभी आहे. त्यावर देखिल आपल्याला मात करायची आहे.पाणी हेच जीवन असून पाणी जपून वापरावे यातच आपले हित आहे.


पाणी हा मानवी जीवनाचा मूलभूत घटक आहे.पाणी नसेल तर संपूर्ण जीवनसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येईल.पाण्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत.एक म्हणजे गोड,आणि दुसरा म्हणजे खारट.गोड पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो.आपल्या पृथ्वीचा ७१टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे,त्यापैकी १टक्के पाणी हे पिण्या योग्य आहे.परंतु सर्वात मोठी समस्या ही आहे की,पिण्याचे पाणी सर्वांत कमी आहे.म्हणूनच त्याची बचत करणे आपले कर्तव्य आहे.पाणी टंचाईचे दुष्पपरिणाम या त्या कारणाने आता जगभर जाणवू लागले आहेत.एकीकडे जलप्रदूषणाचा अतिरेक,पृथ्वीचे वाढणारे तापमान,निसर्गाचे बदलेले ऋतूचक्र त्यामूळे पर्जन्याचे कमी होत जाणारे प्रमाण यामूळे पाणी संवर्धनासाठी वेळीच उपाय योजना केली नाही तर भविष्यात निर्माण होणा-या संकटाची चाहुल ओळखूनच लोकांमध्ये पाण्याबाबत जनजागृती करावी.कारण,पाणी जीवन आहे…त्याचा एक एक थेंब अमृतासमान आहे.

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *