कंधार ; प्रतिनिधी
शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचे सुपुत्र शिवराज पाटील धोंडगे यांचा दि.२३ मार्च रोजी वाढदिवस कोव्हीड प्रादुर्भाव पाहता अत्यंत साधेपणाने कंधार येथिल निवास स्थानी साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यकर्त्या सह मित्रमंडळीनी शिवराज पाटील धोंडगे यांनी आगामी काळात येणारी निवडणूक लढवावी व विजयी व्हावे अशी विनंती करुन सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
दि.23 मार्च रोजी शिवराज पाटील धोंडगे यांचा 41 वा वाढदिवस कंधार येथिल निवासस्थानी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.शिवराज पाटील हे उच्च विद्याविभुषीत असून प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.सर्वच जाती धर्माचे व सर्वच राजकीय व सामाजिक संघटनेतील मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात असून वडील माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या शिकवणीतुन सर्वसामान्य मानूस हाच केंद्र बिंदू मानून चालण्याचे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत.
कोव्हीड -१९ चा प्रादुर्भाव पाहता मोठ्या स्वारुपात होणारा वाढदिवस यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष
दिलीपदादा धोंडगे , तालुकाध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर ,राष्ट्रवादी कॉग्रेस युवक कॉग्रेस तालुकाध्यक्ष माधव मोरे,शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,शरद भागानगरे,भरत चिखलीकर,शरद चिखलीकर,न्यानोबा घुगे,गोपीनाथ केन्दे,संतोष कागणे,माऊली टेलर,सुभाष राहेरकर आदीसह मित्रमंडळीने शिवराज पाटील धोंडगे यांनी आगामी जिल्हा परीषद निवडणूक लढवावी अशी विनंती करुन जिंकण्याचा आशीर्वाद दिला.