कंधार ; प्रतिनिधी
कंधार नगरपालीकेच्या नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२२ मार्च रोजी विशेष सभा संपन्न झाली.कंधार शहराच्या विकासाचा असणारा व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी यापुर्वीच लागला होता.त्यात व्यापारी संकुलातील विद्युतीकरण व विज जोडणीचा ठराव यावेळी पारीत करण्यात आला असल्याची माहीती नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे यांनी दिली.
यावेळी बैठकीत खालील मुद्यावर चर्चा करुन सर्व ठराव पारीत करण्यात आले.
1) विविध योजनेतून विविध कामे प्रस्तावित करणे बाबत. अ) जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेत छोटीगल्ली येथे खाजाभाई यांचे घर ते जोहरे यांचे घर ते सरवरी सर यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व बंद नाली करणे,पाठक यांचे घर ते सद्दीवाल यांचे घर ते म.सुलतान यांचे घर ते जांबकर यांच्या घरा पर्यंत सिमेंट रोड व बंद नाली करणे,छोटीगल्ली येथे माणिक गिते यांचे घर ते फुलारी सर यांच्या घरापर्यंत नालीवर स्लॅब टाकणे.,हतईपुरा येथे शेख मोहद्दीन यांचे घर ते रब्बानी चाऊस यांच्या घरापर्यंत आवश्यक ठिकाणी सिमेंट रोड नाली करणे आणि हतईपुरा येथील कब्रस्थानात उतरण्या करिता आर.सी.सी. पाय-या करणे.,मोठी दर्गाह ते बाबु फुलारी यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व बंद नाली करणे,. छोटी दर्गाह च्या मागे तलावकडे जाणारा रस्ता व पायरीचे बांधकाम करणे.
तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत संभाजीनगर येथे महादेव मंदिर ते डफडे सर यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व आर.सी.सी.नाली करणे.,फुलेनगर येथे सुरेश जोंधळे यांचे घर ते चांभारवेस पर्यंत सिमेंट रोड व आर.सी.सी.नाली करणे.,हतईपुरा येथे कोयल ढवळे यांचे घर ते शेख अब्बास यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व आर.सी.सी.नाली करणे.,बौध्दद्वारवेस येथे गायकवाड यांचे घर ते बंडु जोंधळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व आर.सी.सी.नाली करणे, बौध्द्वारवेस येथे वाघमारे यांचे घर ते बंडु जोंधळे यांच्या घरापर्यंत आर.सी.सी.नाली करणे,साठेनगर येथे किशन कांबळे यांचे घर ते संतोष कांबळे ते मुक्तार कुरेशी यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व बंद नाली करणे,चांभारवेस येथे गंगाधर बनसोडे यांचे घर ते स्वच्छतागृह पर्यंत आर.सी.सी.नाली करणे,सुमेधनगर येथे अंतर्गत सिमेंट रोड व आर.सी.सी.नाली करणे., विकासनगर येथे अंतर्गत सिमेंट रोड व आर.सी.सी.नाली करणे., रमाईनगर येथे रमाईनगरची कमान ते दिलीप कांबळे ते अनिल एंगडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व आर.सी.सी.नाली करणे.,संभाजीनगर वरचा भागात श्री गादेकर यांचे घर ते श्री गणेश तुतडवाड यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजुने वरील प्रस्तावित विकास कामे करण्यासाठी मुद्दा सभागृहापुढे सादर.आर.सी.सी.नाली करणे.
आणि सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत नवा मारोती ते बमखाजा दर्गाह पर्यंत सिमेंट रोड व रोड क्रॉसिंग केलेल्या कामाच्या शिल्लक रक्कमे मधून नवा मारोती ते गांधीचौक पर्यंत सिमेंट रोडचे काम करणे यामध्ये सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत नवा मारोती ते बमखाजा दर्गाह पर्यंत सिमेंट रोड व रोड क्रॉसिंग करणेच्या कामाचे निविदा किंमत रुपये 21,63,492.00 असता करण्यात आलेल्या कामाचे मोजमाप अंती मुल्यांकन रुपये 18,33,218.00 होत असून शिल्लक रक्कमेच्या अनुषंगाने नवा मारोती ते गांधीचौक पर्यंत सिमेंट रोडचे काम करण्यासाठी मुद्दा सभागृहापुढे सादर करण्यात आला.
आणि शहराच्या विकासाचा असणाऱ्या व्यापारी संकुलातील विद्युतीकरण व विज जोडणी बाबत
व्यापारी संकुलातील विद्युतीकरण व विज जोडणी आणि अग्निशमन योजनेची कार्यवाही करण्यासाठी मुद्दा सभागृहापुढे सर्वानुमते पास करण्यात आला.यावेळी नगरपालीकेचे सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.