दिवशी येथील बलात्कार व खून प्रकरणी सालगडी आरोपीला फाशीची शिक्षा ;भोकर न्यायालयाचा ऐतीहासीक निकाल

भोकर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील दिवशी (बु) येथे ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने ३५ वर्षीय सालगडी आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली आहे न्यायाधीश मुजीब शेख यांच्या कोर्टाने निकाल दिला आहे .


दि २० जानेवारी रोजी दिवशी बु येथील पाच वर्षीय चिमुरडीवर नराधम सालगडी बाबू सांगेवार या आरोपीने बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून गजाआड केले होते पिडित चिमुरडीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध पोलिसात बलात्कार,खून व बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती . या पार्श्‍वभूमीवर भोकर पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत केवळ १९ दिवसात येथील न्यायालयासमक्ष आरोपीविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते .सदरील खटला न्यायाधीश मुजीब शेख यांच्यासमक्ष जलद गती कोर्टात चालविण्यात आला .

दिनांक २३ मार्च रोजी या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली .साक्षी पुराव्यात आरोपी सर्व गुन्ह्यात दोषी आढळून आल्याने न्यायालयाने आज आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली आहे केवळ ६१ दिवसात हा निकाल घोषित करण्यात आला आहे .या खटल्याचा निकाल घोषित होताच पीडितेच्या वडिलांनी माझ्या मुलीला सन्माननीय न्यायालयाकडून न्याय मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत दरम्यान आज पोलिसाकडून कोर्टात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आरोपीतर्फे जगदीश जाधव नंदगावकर तर सरकार पक्षातर्फे अॅड . रमेश राजूरकर यांनी काम पाहिले .

2 thoughts on “दिवशी येथील बलात्कार व खून प्रकरणी सालगडी आरोपीला फाशीची शिक्षा ;भोकर न्यायालयाचा ऐतीहासीक निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *