कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील बारुळ सर्कल मधील एक सामान्य नेतृत्व व लोहा -कंधार आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे समर्थक ओम ठाकुर यांची चांगलीच पक्कड निर्माण केली आहे व गोरगरीबांच्या सुख-दुखात धावुन जाणारा कार्यक्रता म्हणून ओम ठाकुर यांची ओळख आहे .ओम ठाकुर यांनी आज पर्यतच्या कार्यकाळात महाराणा ब्रिगेड चे कंधार तालुका अध्यक्ष तथा अखिल भारतीय क्षत्रिय महासभा कंधार तालुका अध्यक्ष व आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे आय. टी. सेल.प्रमुख हे पद सांभाळून लोहा -कंधार सारख्या ग्रामीण भागामध्ये चांगलीच पकड निर्माण केली आहे व सामाजिक कार्यक्रंता ते राजकारण यांची सुरुवात यांनी या छोट्याशा पदावरुन केली आहे .
बारुळ सर्कल मधुन ओम ठाकुर यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी इच्छा बारुळ सर्कल मधील गावातील नागरीकांनी व कार्यक्रत्यांनी केली आहे . बारुळ सर्कल मधील सर्व -हितचिंतकांचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी ओम ठाकुर यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे व कार्यक्रत्याच्या गाठीभेटी घेणे चालु केले आहे .
बारुळ सर्कल मधील कार्यक्रत्यांना उत्साह पाहता ओम ठाकुर यांना पंचायत समिती तिकीट आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी धावे व एका सामान्य कार्यक्रत्याला राजकारणात सक्रीय करावे हि मागणी लोहा -कंधार मतदार संघातील सामान्य नागरिकांनी केली आहे .