दिव्यांग बांधवांना घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याची न.पा.मुख्याधिका-यांना मागणी

कंधार ; प्रतिनिधी

दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी खर्च करा व शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांना घरपट्टी आणि नळपट्टी माफ करा. असे निवेदन प्रहार दिव्यांग संस्था शहर शाखा कंधार च्या वतीने नगरपालीका मुख्याधिकारी विजय चव्हाण यांना प्रतिनिधी मार्फत देण्यात आले.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे दिव्यांगाची बेहाल होत आहे.त्यांच्यावर उपासमारीची वेळ असल्याने तात्काळ नगरपालीका प्रशासनाने दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी खर्च करा व शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांना घरपट्टी आणि नळपट्टी माफ करा. असे निवेदन प्रहार दिव्यांग संस्था शहर शाखा कंधार च्या वतीने नगरपालिका येथे घेण्यात आले.यावेळी दिव्यांग महिला तालुकाध्यक्ष संगिता वाखरडकर,शेख फेरोज रहेमान ,शेख आतिख अहेमद,शेख कुर्शीद आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *