विष्णुपुरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात सर्रास रेती उपसा ..माफियांचे प्रशासनाशी साटेलोटे, आधिकारी , कर्मचारीच छुपे रुस्तुम
नांदेड,
विष्णुपुरी प्रकल्पपाच्या बुडीत क्षेत्रातील अवैद्य रेती उपशा विरोधा तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ विपीन यांनी मोहिम राबवली. भनगी, पिंपळगाव (नि) परिसरात जिल्हाधिकार्यांनी स्वतः कारवाई केल्याने आता माफियांची खैर नाही आशा भावना निर्माण झाल्या. मात्र कर्तव्याला पेक्षा अर्थहिताला महत्व देणार्या अधिकारी, कर्मचार्यांनी माफियांसमोर नांग्या टाकल्याने प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात सर्रास रेती उपशाला उधान आले आहे.
लाॅकडाउन कालावधीत कोविड १९ च्या दहशतीखाली वावरणार्या नागरिकांच्या सुरक्षेची थट्टा मांडत रेती माफियांनी विष्णुपुरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात सर्रास अवैद्य रेती उपसा सुरू आहे. महसुल प्रशासनाच्या स्थानिक अधिकारी, कर्मचार्याच्या मुकसंमतीने सुरू असलेला रेती उपशाच्या बेलगाम वारूला आवरण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ विपीन यांनी स्वतः नदी पात्रात उतरुन मोहिम उघडली होती. मात्र महसुल प्रशासनातील निष्क्रीय अधिकारी कर्मचार्यांनी कर्तव्याच्या आडून अर्थहितास महत्व देत माफियांसमोर लाचारी पत्करल्याने जिल्हाधिकार्यांच्या कारवाईची आंमलबजावणी होण्यापुर्वीच बुडीत क्षेत्रात तराफे, सक्शनपंपाद्वारे सर्रास अवैद्य रेती उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे रेतीची अवजड वाहनाद्वारे वाहतुक करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या पिंपळगाव (नि ), रहाटी, सोमेश्वर, भनगी, वाहेगांव, गंगबेट, जैतापुरसह अंतेश्वर बंधार्यापर्यंतच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
—–आंदोलनाचा विसर : लाॅकडाउन कालावधीत बेसुमार अवैद्य रेती उपसा प्रकरणी कारवाईसह विविध मागण्यासाठी सोमेश्वर शिवारात नदीकाठी सुरू असलेल्या सत्याग्रह, अन्नत्याग आंदोलनाचा माफियांच्या चिरीमिरीपुढे प्रशासनाला विसर पडला आहे.