छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविला प्रकरणी लोहयात शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध ;
लोहा ; विनोद महाबळे
कर्नाटक मधील भाजपा सरकारने बेळगाव जिल्ह्यातील मनुगती गावात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविला प्रकरणी महाराष्ट्र यांचे तीव्र पडसाद उमटले असून लोह्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोहा -_कंधार शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा दि.९ रोजी तीव्र निषेध करण्यात आला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्यास जोडे मारून तीव्र आंदोलन करण्यात आले.
शिवसैनिकांनी भाजपशासित कर्नाटक सरकारच्या विरोधात व भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्यास जोड्याने मारून बदडून काढले.व कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ बसविण्याची मागणी केली.
यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्याला जोडे मारताना लोहा पोलिसांनी तो पुतळा ताब्यात घेतला.यावेळी शिवसेनेचे लोहा -कंधार चे नेते बाळासाहेब पाटील कराळे, कंधार पंचायत समितीचे सदस्य उत्तम भाऊ चव्हाण, विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, लोहा तालुका प्रमुख संजय पाटील ढाले, कंधार तालुकाप्रमुख माधव मुसळे, लोहा शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार, किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, माजी तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल , युवा सेनेचे लोहा तालुका प्रमुख धनराज पाटील, युवा सेनेचे शहर प्रमुख गजानन कराडे, संतोष एंडाळे, मारुती पंढरे, नागोराव पाटील शिरसाट, अमर शेख, अजित तुतरवाड, साहेबराव हरगावकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. तसेच यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांनीही आंदोलनाला भेट देऊन शिवसेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला व कर्नाटक सरकारचा निषेध केला.