प्रिय गुरुजी,… शिवाजी आंबुलगेकर…

प्रिय गुरुजी,…
शिवाजी आंबुलगेकर…

उपक्रमशिल शिक्षक,नामवंत साहित्यिक, उद्गगार मासिकाचे संपादक,मराठी मायबोली परिषेदचे प्रमुख.गेली २५ वर्षापासून शैक्षणिक,सामाजिक,व साहित्य क्षेत्रातील योगदान. त्यांनी शाळेत श्रावण अभिवाचन माला, विद्यार्थी-लेखक,अनुवादाची आनंद शाळा,भटक्यांच्या बोलीचे शब्दकोश, माझ्या गावचा भूगोल असे अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत.  शिवाजी आंबुलगेकर हे मराठीचे शिक्षक तसे ते महाराष्ट्रात प्रयोगशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.यंदाचं श्रावण अभिवाच हुकलं याची त्यांना मोठी खंत हि असावी. त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थीनां त्यांच्या त्यांच्या गावचा भूगोल लिहायला सांगून यातून त्यांना संशोधनाची नवी दिशा मिळवुन दिली. शेकडो शाळा व महाविद्यालयीन स्तरावर वाचन संस्कृती रुजविण्यात शिवाजीरावांचं मोठं योगदान आहे. उपक्रमशीलता शिकावी ती यांच्याकडून.   

  त्यांना तुका म्हणे ऐशा नरा या एकांकिकेस राज्यशासनाचा मामा वरेरकर पुरस्कार, डॉ.जे.पी.नाईक राज्य शिक्षक पुरस्कार,साने गुरुजी कथा माला पुरस्कार,जिल्हा शिक्षक पुरस्कार,साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्धल राज्यस्तरीय ‘ज्ञानाचार्य’ पुरस्कार,परभणीच्या कृषी महाविद्यालयाचा संजीवनी राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार आदि पुरस्काराणी ते पुरस्कृत आहेत.उपक्रमशील विद्यार्थीप्रिय शिक्षकास दरवर्षी महाराष्ट्रातील गुणवंतांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्धल पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते त्यात शिवाजी अंबुलगेकर यांचा समावेश.       

आयुष्य भरभरून कसं जगावं हे कोणी यांच्याकडून शिकावं.कला व छंदावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व. सुख-दुःखात कशीही परिस्थिती असो नेटानं उभं राहिलं पाहिजे अन ठाम असलं पाहिजे ही त्यांची शिकवण. कथा,कविता आणि ग्रामीण लेखनासाठी अनेकांना प्रवृत्त करणारे’अनेकांचे राजे.आम्हा परिसरातील भूषण.प्रयोगशील शिक्षक,विद्यार्थीप्रिय,साहित्य व कवी,नाटककार, छायाचित्रकार क्षेत्रात (शिवादादा)अशी ओळख.बहुआयामी व्यक्तिमत्व मायबोली गणगोताची शान व अनेकांचा अभिमान. विद्यार्थीसह आम्हास ही पूरक वाचन व लेखनाची गोडी लावणार व्यक्तिमत्व आदरणीय शिवाजी आंबुलगेकर सर अनमाेल माेती.गुरुजी आज दि.९ रोजी  आपणास वाढदिवसाच्या निमित्य अनंत सदिच्छा…!   

                              
 मुरलीधर थोटे,                 

 मायबोली मराठी परिषद,कंधार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *