बिलोली ; प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील मौ.बावलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हि शाळा शासनाने ठरवून दिलेले नऊ निकषाची पुर्तंता केल्यामुळे या शाळेला तंबाखूमुक्त शाळा म्हणून दि.२२ मार्च२०२१ रोजी प्रमाणपञ मिळाले असून सदरिल शाळा हि तालुक्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
◼️महाराष्ट्र राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्या बाबत राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने भारत सरकारच्या आरोग्य मंञालयाने दिलेल्या नवीन मार्गदर्शक सुचनानुसार परिपञकच काढले आहे.या परिपञकानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेत व संस्थेच्या परिसरात तंबाखूचा प्रचार,प्रसार व वापरास आळा घालण्यासाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये तंबाखु व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम याविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी शासनाने नऊ निकष ठरवून दिलेले आहे.या नऊ निकषाची पुर्तता करुन त्यासंबंधीचे सर्व लेखी पञ,पोस्टर,बॕनर,फोटो tobacco free app वर डाऊनलोड केल्यानंतरच पाठविलेले सर्व पुरावे व फोटो तपासल्यावरच शाळेस तंबाखूमुक्त शाळा म्हणून प्रमाणपञ मिळते.
◼️शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन,गट साधन केंद्र,सलाम फाऊंडेशन,अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली,नशाबंदी मंडळ मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने बावलगाव येथील शाळेने यलो लाईन सह नऊ निकषपुर्ण केले आहे.तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी डी.के तोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ राचेवाड,अल ईम्रान प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.मोहसीन खान,जिल्हा समन्वयक रवी ढगे,शिक्षण विस्तार अधिकारी सागरबाई भैरवाड,केंद्रप्रमुख माधव लोलमवाड,नशा बंदी मंडळाचे जिल्हा समन्वयक ईजि.ईम्रान खान आदिंनी विशेष परिश्रम घेतले.तर शाळेतील शिक्षक राजाराम कसलोड,गंगाधर रामटक्के,शारदा कनशेट्टे,कल्पना बोधने,सरपंच लक्ष्मण गायकवाड,उपसरपंच रमेश छप्पेवार,शा.व्य.स.अध्यक्ष गंगाधर छप्पेवार,वार्ताहर शिवराज रायलवाड सह सर्व गावक-यांचे सहकार्याने व मदत मिळाली.