श्री शिवाजी काॕलेज कंधारचे प्रयोगशाळा सहाय्यक दिलीप सीताराम फुले यांचे हैद्राबाद येथील रुग्णालयात आज दि. 24 मार्च 2021 रोजी निधन

कंधार ; प्रतिनिधी

श्री शिवाजी काॕलेज कंधारचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री दिलीप सीताराम फुले यांचे हैद्राबाद येथील रुग्णालयात आज दि. 24.3.2021 रोजी दुपारी 2 वा.च्या दरम्यान दुःखद निधन झाले.

श्री दिलीप सीताराम फुले यांना आदरणीय डाॕ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी व आदरणीय भाई गुरुनाथरावजी कुरुडे सहेबांनी 1990 ला श्री शिवाजी काॕलेज कंधार येथे प्रयोगशाळा परिचर म्हणून सेवेत घेतले तद्नंतर त्यांचे प्रमोशन होवून प्रयोगशाळा सहाय्यक झाले. तेंव्हापासून वनस्पतीशास्त्र विभागात सेवा केली. दिलीप टेबलवर्क करण्यात हुशार असल्याने महाविद्यालय प्रशासनाने त्यांना अगोदर ज्युनिअर काॕलेजचा प्रवेश विभाग दिला तो त्यानी सक्षमपणे विना तक्रार सांभाळला. श्री अंबेकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर अनुभवी माणूस तयार व्हावा म्हणून पुढे त्यांची काम करण्याची तयारी पाहुन वरिष्ठ महाविद्यालयाचा प्रवेश विभाग त्यांना दिला आणि तोही विभाग मोठ्या उत्साहाने आणि आवडीने ते सद्या सांभाळत होते पण नियतीला हे जास्त काळ मान्य नव्हते. अलीकडच्या काळात त्यांना शुगरचा जास्त त्रास झाल्यामुळे त्यांना नांदेडला आणि नंतर लगेच हैद्राबाद येथील रुग्णालयात शरीक करावे लागले त्यातच त्यांना कोरोणाने गाठले. प्रकृतीने साथ सोडली आणि काळाच्या नियतीने घाला घातल्याने त्यांचे दुःखद निधन होवून ते अनंतात विलीन झाले. सद्याच्या परिस्थितीत त्यांचा अंत्यविधी आजच हैद्राबाद येथे करावा लागणार आहे. स्वभावाने अत्यंत शांत, सर्वांचा आदर करणारा, कामाला देव मानणारा, कमी पण चांगलच बोलणारा मितभाषी भला माणूस आज आम्हां सर्वांमधून निघून गेला. त्यांच्या जाण्यामुळे महाविद्यालयात निर्माण झालेली पोकळी आता भरुन निघणे अशक्य ! फुले कुटूंबिंयाच्या दुःखात श्री शिवाजी काॕलेज कंधारचे प्राचार्य, प्राध्यापक, सर्व शिक्षकेत्तर बांधव व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता. कंधार सहभागी आहे. फुले कुटूंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

! जयक्रांति !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *