लोहा/श.प्र.शिवराज दाढेल लोहेकर..
लोहा,शहर हे पंचवीस हजाराच्या वर लोकसंख्या असलेले शहर आसून यात इंदिरानगर (दलित वस्ती) हे देखील जवळपास ३५०० लोकसंख्या असलेली दलित वस्ती आहे. ह्या वस्तीमध्ये सर्व जाती-धर्मा बरोबर अल्पसंख्यांक, मागासवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात राहतात व यात हमाली,मिस्त्री,मजुरी,रोजनदारीने काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.आणि आसे असल्यामुळे यांच्यात अ सुशिक्षित पालक वर्गाची संख्या देखील जास्त प्रमाणात आहे.त्याचबरोबर जिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांची संख्या ही उल्लेखनीय आहे त्यात छोट्या मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण देखील खूप कमी आहे.छोट्या मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी गेल्या आनेक दिवसांपासून ह्या वस्ती मध्ये एक नवीन अंगणवाडी मिळावी यासाठी पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुका अध्यक्ष तुकाराम दाढेल व मारोती शेळके यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे वारंवार पाठपुरावा केला व मा.बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती रेखा काळम यांनी इंदिरानगर लोहा येथे नवीन अंगणवाडी देऊन इंदिरानगर येथील रहिवाशांच्या प्रयत्नास यश मिळवून दिले आहे.दिनांक २३ मार्च २०२१ मंगळवार रोजी या अंगणवाडी चे उद्घाटन लोहा न पा चे मुख्याधिकारी गंगाधर पेंट साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे साहेब, सौ.सावंत मॅडम,अंगणवाडी सुपरवायझर (लोहा-कंधार),नगरसेवक प्रतिनिधी मारोती शेळके, पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुका अध्यक्ष तुकाराम दाढेल,शंकर वाघमारे,चांदू दाभाडे,अंगणवाडी सेविका सौ.यमुना गाडे (वाघमारे),सौ.कुंभारे मॅडम,पालक सौ.शकुंतलाबाई दाढेल,सौ. दाभाडे आदी उपस्थित होते.
इंदिरानगर (दलित वस्ती) येथे नवीन अंगणवाडी उपलब्ध करून दिल्याबद्दल इंदिरानगर येथील रहिवाशांच्या वतीने श्रीमती रेखा काळम मॅडम यांचे आभार व्यक्त करण्यात आले. व तसेच याठिकाणी श्रीमती यमुना गाडे (वाघमारे) मॅडम यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती मिळाली असल्याने इंदिरानगर मधून त्यांचे कौतुक होत आहेत.