माझी तब्येत ठणठणीत संपर्कात आलेल्यानी टेस्ट करावी — माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी

लोहा / श.प्र.शिवराज दाढेल लोहेकर.
माझी तब्येत चांगली ठणठणीत आहे संपर्कात आलेल्यानी कोरोना टेस्ट करावी असे आवाहन माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांनी केले आहे.


कोविड लस घेतल्या नंतर न. कळत कुणाच्या तरी संपर्कात आल्यानी लोहयाचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांची कोरोना टेस्ट पाॅझिटीव आली असून त्यांना त्यांचे पुतणे लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी एका विशेष अंबुल्नस द्वारे पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथील अपोलो रूग्णालयात दाखल केले असून माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांची तब्येत अगदी ठणठणीत असुन लोहा वाशियांनी काही काळजी करू नये असे आवाहन कल्याण सावकार सुर्यवंशी यांनी केले असून जे जे मित्रमंडळी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी विनाकारण रस्त्यावर फिरू नये आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी तोंडाला मास्क लावावा सोशल डिस्टशन पाळावे हाताला सॅनिटायझर वापरावे सर्दी ताप खोकला आल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे असे आव्हान माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *