नांदेड ; प्रतिनिधी
मराठा महासंग्राम संघटनेच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक लातूर येथील मराठा महासंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजकुमार पाटील सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .या बैठकीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष उपस्थित होते बैठकीला सुरुवात होण्याअगोदर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.राजकुमार पाटील सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठा महासंग्राम संघटनाही ज्या ठिकाणी मराठा समाजावर अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी महाराष्ट्रभर का अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मराठा महासंग्राम संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे काम करताना कार्यकर्ते दिसत आहेत त्यामुळे सर्व समाजामध्ये परिचित व समाजासाठी अहोरात्र काम करणारे विक्रम पाटील बामणीकर यांची सर्वानुमते मराठा महासंग्राम संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व नांदेड जिल्ह्यात चांगल्याप्रकारे मराठा महासंग्राम संघटनेचे काम करणारे तरुण तडफदार प्रदीप पाटील हुंबाड नंदनवनकर यांची नांदेड जिल्हा प्रमुख पदी व तिरुपती पाटील भागानगरे नांदेड जिल्हा सल्लागार यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राजकुमार पाटील सूर्यवंशी यांनी या विभागीय बैठकीच्या आढावा प्रसंगी निवड करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवड झाल्यानंतर विक्रम पाटील बामणीकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या मराठवाड्यात मराठा महासंग्राम संघटनेची जबाबदारी माझ्या सामान्य कार्यकर्त्यावर दिले आहे त्यामुळे मी सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राजकुमार पाटील सूर्यवंशी यांचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेचे तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख अशा निवडी करून संघटनेचे जोमाने काम करणार आहे व ज्या ठिकाणी मराठा समाजावर अन्याय होईल त्या ठिकाणी सर्वात पुढे मराठा महासंग्राम संघटना ही पुढे असेल असे विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
नांदेड जिल्हा प्रमुख पदाची पुन्हा एकदा माझ्यावर जबाबदारी पडली त्यामुळे पुन्हा मी नांदेड जिल्ह्यात मराठा महासंग्राम संघटनेचे जोमाने काम करून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व शेतकरी कष्टकरी गोरगरिबांसाठी काम करून मराठा महासंग्राम संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात व तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गाव तेथे शाखा व घर तेथे मराठा महासंग्राम संघटनेचा कार्यकर्ता निर्माण करणार असल्याचे प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख नांदेड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते यावेळी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्याचें अभिनंदन केले जात आहे.