नांदेड – शहरातील देगाव चाळ येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० जयंतीनिमित्त भीमजयंती मंडळाची स्थापना ( दि. ३ रोजी )करण्यात आली. यात जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी विक्की सावंत, उपाध्यक्षपदी तथागत ढेपे तर सचिवपदी विनोद खाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमेश भाऊ गोडबोले हे होते तर ज्येष्ठ नागरिक जळबाजी थोरात, उत्तम गवारे यांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर जयंती साजरी करायची की नाही याबाबत पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी शहरातील आंबेडकरी नेत्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जयंती साजरी करण्यात येईल असे ठरले. देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात स्थापन करण्यात आलेल्या उर्वरित कार्यकारिणीत कोषाध्यक्ष माधव गायकवाड, यशोदिप गोडबोले, सल्लागार म्हणून सुभाष लोखंडे, राजू गोडबोले, राजू गच्चे, बंटी लांडगे सहसचिवपदी किरण पंडित, प्रकाश दिपके सदस्य प्रकाश हटकर, माधव निखाते, राहुल दुधमल, शाखा नरवाडे, गौरव पंडित, प्रथमेश कापुरे, संकेत नरवाडे,रोहन नरवाडे, प्रशांत नवघडे, आकाश कदम, लखन वारकर, आनंद हटकर, विनायक भोळे, संदिप राजभोज, शेखर हिंगोले, सुमेध कोकरे, मोहित गोडबोले, सोनू नवघडे,अजय हटकर, विनय हिंगोले, बंटी हटकर, बंटी शेळके यांचा समावेश आहे. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष लोखंडे यांनी केले.