मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक पार पडली आणि राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून ते ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंद लागू करण्यात आले असून राज्य सरकारनं त्यासंदर्भातली नियमावलीही जाहीर केली आहे. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2021) सामने मुंबईत होणार की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम होतं. पण, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएल २०२१चे सामने ठरल्याप्रमाणे मुंबईतच होतील, अशी माहिती दिली. IPL मधील २० षटकं, पण कोणत्या षटकात कुणी केल्यात सर्वाधिक धावा? रोहित शर्माचं नावचं नाही
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे मुंबईत एकूण १० सामने होणार आहेत. त्यात मुंबईत दाखल झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) व दिल्ली कॅपिटल्स ( DC) या संघातील प्रमुख खेळाडूला कोरोना लागण झाली आहे. शिवाय वानखेडे स्टेडियमवरली ८ कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे हे सामने इतरत्र हलवले जातील अशी चर्चा सुरू झाली होती. BCCIनं त्यासाठी हैदराबाद व इंदूर हे पर्याय राखून ठेवले होते. पण, आता हे सामने मुंबईतच होतील, परंतु BCCI व IPL फ्रँचायझींना महाराष्ट्र सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल, असे मलिक यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले,”नियमांचे पालन करूनच सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी असेल. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला एकाच ठिकाणी आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. जास्त लोकं जमता कामा नयेत. या सर्व अटी मान्य केल्यानंतर आम्ही परवानगी दिली आहे.अनेकांनी लसीकरणाची मागणी केली. बीसीसीआयनंही खेळाडूंना लस द्यावी अशी विनंती केली. पण, केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय आम्ही ते करू शकत नाही,”असे मलिक यांनी स्पष्ट केलं. वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने १० होणार आहेत.
राज्यात आजपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्य़ात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे.
शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन असेल
लोकल ट्रेन सुरू राहणार आहेत, जिम बंद होणार आहेत
अत्यावश्यक सेवांना परवनगी असेल. रेस्टॉरंट, मॉल टेक अवे म्हणजे पार्सल सर्व्हिस सुरु राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी असेल.
रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. धार्मिक स्थळांवर पूर्णपणे निर्बंध असतील. सिनेमागृह, नाट्यगृह, शाळा महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस संपूर्णत: बंद आणि गार्डन, मैदानेही बंद राहणार आहेत. जिथे केसेस वाढताहेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला असणार आहे. सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही. रिक्षामध्ये ड्रायव्हर + 2 लोक तर बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल. टॅक्सीत मास्क घालावा लागेल. कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना असून मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी असेल.
चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी राहील.
बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल.
गेल्या काही दिवसांपासून रोज ४० हजारांच्या वर रुग्ण समोर येत आहेत. आधीपासूनच राज्यातील पुण्यासह अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.
वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी असे सांगतांना उद्धव ठाकरे यांनी कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन केले.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
राज्यात कोरोनाची स्थिती वाढत असून, लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडमधील सर्व पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून घोषित केले असून, कोणत्याही वयोमर्यादेच्या बंधनाशिवाय पत्रकारांना कोरोना लस देण्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना कोरोना लस देण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. यासंदर्भात एक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आव्हाड यांनी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे की, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणेजरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी अशी विनंती केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पत्रकारांना लस देण्याची मागणी केली आहे. असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. खेळाडूंचे लसीकरण होणार नसले तरी पत्रकारांना सरसकट लस मिळणार का याकडे तमाम पत्रकारांचे लक्ष लागले आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
दि.५/०४/२०२१