नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे या गंभीर व पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे हे इंजेक्शन कोरोना रुग्णांना ज्यादा दराने विक्री केली जात असल्याची तक्रार रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत आहेत त्यामुळे या बाबीकडे लक्ष देऊन जिल्हा प्रशासनाने पूर्ण रुग्णांना हे इंजेक्शन ज्या मूळ किमतीमध्ये उपलब्ध आहे त्याच किमतीमध्ये उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने जिल्हा अधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नांदेड शहरातील विविध ठिकाणच्या कोविड सेंटरवर दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत कोरोना रुग्णांच्या अनेक नातेवाईकांनी आशा तक्रारी मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांच्याकडे केले आहेत त्यामुळे या रुग्णांची तात्काळ दखल घेऊन मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना निवेदन देऊन रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ कोरोना रुग्णांना मूळ किमतीतच देण्यात यावेत व काळ्याबाजारात ज्यादा दराने विक्री करून जे मेडिकल विक्रेता कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करित आहेत त्या मेडिकल वर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशीही मागणी मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे व दिलेल्या निवेदनावर त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.