पदमश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते आज झाले उदघाटन ; समारोपाला प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर उपस्थित राहणार.
नांदेड- अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानमालेचे उद्घाटन आज दि.१० एप्रिल रोजी सकाळी उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्अते झाले तर समारोप डॉ. यशवंत मनोहर करणार आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम आंबेडकरी विचारवंत या व्याख्यानमालेत सहभागी होणार असून, दिनांक १० एप्रिल पासून दररोज सायंकाळी सात वाजता महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाईव्ह प्रसारण असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक गंगाधर ढवळे यांनी दिली.
ऑनलाईन व्याख्यानमालेचे पहिले उदघाटकीय पुष्प १० एप्रिल रोजी ‘बाबासाहेबांचे संविधानराष्ट्र कोणासाठी?’ या विषयावर उपराकार पदमश्री लक्ष्मण माने हे गुंफणार असून १६ एप्रिल रोजी प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर समारोपीय सत्रात ‘बाबासाहेबांची जयंती म्हणजे
युगांतराचे नियोजन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ११ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी समाजवाद – डॉ. अनंत राऊत , १२ रोजी बाबासाहेब, संविधान आणि शेतक-यांची आंदोलने – डॉ. प्रकाश राठोड, १३ एप्रिलला बाबासाहेबांचा व्यवस्थांतराचा तत्त्वव्यूह या विषयावर स्वा. रा. ती. म. विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुल विभागाचे प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर हे चौथे पुष्प गुंफणार आहेत. पाचव्या दिवशी डॉ. अक्रम पठाण हे क्रांतीचे चक्र पूर्ण केव्हा फिरेल? या विषयावर बोलतील.तर १४ एप्रिल रोजी ‘आज साहित्यिक आणि बुद्धिजीवींची भूमिका काय असावी? या विषयावर प्रा. डॉ. माधव सरकुंडे हे भाष्य करणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक ऑनलाईन पद्धतीने सदरील व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून सोशल मीडियावर सदरील लिंक प्रसारित काण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन करा.घरी रहा सुरक्षित रहा. घरीच जयंती साजरी करा आणि घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करा, असाही संदेश यामाध्यमातून देण्यात येत आहे. महामंडळाचे पदाधिकारी अशोक बुरबुरे अरविंद निकोसे डॉ. सिमा मेश्राम, प्रशांत वंजारे, संजय मोखडे, छाया खोब्रागडे, अमृत बनसोड, सुरेश खोब्रागडे, संजय डोंगरे हे व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.