कंधार ;(युगसाक्षी वृत्तसेवा )
कंधार तालुक्यातील बाचोटी, आंबुलगा, फुलवळ, वाखरड व चिंचोली या गावांना वादळी वां-याने झोडपले होते.त्यांची पाहणी तहसिलदार व्यंकटेश मुंडे व तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी सोमवारी दुपारी दि.१२ एप्रिल रोजी केली.
दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वारा व पावसानी हजेरी लावली होती.यामध्ये गहू ,आंबा यासह अन्य पिकाचे अतोनात नुकसान झाले होते.त्यांची पाहणी कंधार चे तहसिलदार व्यंकटेश मुंडे,तालुकाकृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्या पथकांनी पाहणी केली.त्यात अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
अमराई साठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाचोटी येथिल आंब्यांचे मोठे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या केशर आंब्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सदरील केशर आंबा विदेशात विक्रीसाठी काढल्या जाणार होता.परंतु अचानक दि.११ एप्रिल रोजी अचानक झालेल्या वादळी वा-याने पावसाने या केशर आंब्याचे आतोनात नुकसान झाले असून लाखो रुपयाचा फटका या बसला असल्याची माहीती तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली असून लवकरच शासनाची मदत मिवळुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ताहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.