कंधार ; धोंडीबा बोरगावे
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना. चार दिवसांपूर्वी ८ एप्रिल रोजी आई सीताबाई रामराव पांचाळ यांचे दुःखद निधन तर आज ता. १२ एप्रिल रोज सोमवारी त्यांचेच सर्वात छोटा मुलगा कैलास रामराव पांचाळ वय ४५ वर्ष यांचा दुर्दैवी अंत झाला . या घटनेने पांचाळ कुटुंबियांवर तर आभाळ कोसळलेच परंतु अख्या फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे.
सर्वत्र कोरोनाचा हाहाकार आणि दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णाबरोबरच वाढता मृत्यू चा आकडा पाहता जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तरी शोशल मीडियावर बाधित रुग्ण संख्या आणि मृत्यू चा आकडा याकडे जास्तीचे लक्ष वेधले जात असल्यामुळे सर्वसामान्यांच्या वैचारिक पातळीचे दिवसेंदिवस खच्चीकरण होत असल्याने सामान्य माणूसही भयभीत परिस्थिती आपले जीवन जगत असून कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू होणाऱ्यापेक्षा भयभीत होऊन मनोधैर्य खच्चीकरण होणाऱ्यांचेच मृत्यू चे प्रमाण जास्त आहे की काय ? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जे योग्यवेळी स्वतःहून उपचार घेण्यासाठी योग्य रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या ही नक्कीच जास्तीची आहे हे तर मान्यच करावे लागेल.
परंतु या शोशल मीडियाने कोरोना बाबतीत चांगलाच कहर माजवला असल्याने आणि काही अर्धज्ञानी लोकांच्या उतावीळपनाच्या मॅसेज , व्हिडीओ आशा पोस्टमुळे समाजात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे त्यावर कोणी आवर घालेल का ? असा प्रश्न ही निर्माण झाला आहे. आणि सकारात्मक बीबीच्या सामान्यांना धीर देणाऱ्या भयमुक्त बातम्या , व्हिडीओ ची कमतरता आणि माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या मॅसेज ची प्रकर्षाने कमतरता जाणवते आहे.
फुलवळ येथील सीताबाई पांचाळ या तशा शरीरयष्टी ने सदृढ होत्या मृत्यू च्या ४,५ दिवसापूर्वीच कोविशील्ड ची लस घेतली होती आणि त्यांची तब्येत पण तशी ठणठणीत होती , परंतु ८ एप्रिल रोजी सायंकाळी अचानक त्यांची प्राणज्योत मावळली . त्याच दिवशी त्यांचे छोटे सुपुत्र कैलास पांचाळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी हैदराबादकडे हलवण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान आज ता. १२ एप्रिल रोजी त्यांचा ही दुर्दैवी अंत झाला.
एकाच कुटुंबात अवघ्या चार दिवसाच्या अंतराने माय-लेकरचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पांचाळ कुटुंबियांवर हा काळाने घाला घातल्याने त्या कुटुंबियांबरोबरच अख्या फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे.
कैलास पांचाळ हे पेशाने सह शिक्षक होते , त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , चार भाऊ , एक बहीण असा मोठा परिवार आहे. कैलास पांचाळ यांच्या दोन्ही मुली डॉक्टर होत असून एक मुलगी एम बी बी एस ला आहे तर दुसरी मुलगी बी ए एम एस ला शिक्षण घेत आहे.