आजी – माजी आमदारांना लाजवत ज्येष्ठ नेते पटणे यांनी कोरोना बाधित रुग्णांची भेट घेतली
बिलोली ; नागोराव कुडके
बिलोलीचे माजी आमदार गंगाधरराव पटणे यांनी बिलोली शहरातील कोरोना बाधित व्यक्तींची भेट घेऊन वर्तमान स्थितीत कोरोना केअर सेंटर मधील सोयीसुविधा याविषयी माहिती जाणून घेतली.
बिलोलीचे माजी नगराध्यक्ष तथा माजी आमदार तालुक्यातील ज्येष्ठ नेते श्री गंगाधरराव पटणे यांनी कोरोणा बाधित झालेल्या रुग्णांची भेट घेतली. कोरोना केअर सेंटर मध्ये असलेल्या सोयी सुविधा याबाबत इत्थंभूत माहिती जाणून घेतली. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्याशी ही संवाद साधला. राखीव मतदारसंघ झाल्यानंतर बाहेरून आयात झालेले माजी आमदार आणि विद्यमान आमदार कोरोनाच्या बाबतीत भयभीत झालेले असताना माजी आमदार गंगाधरराव पटणे मात्र कोरोना साठी मोठी निधी आपल्या संस्थेमार्फत दिली तद्वतच कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करत ज्येष्ठते बरोबरच आपल्या श्रेष्ठ गुणांचे दर्शन घडवून गेले.