शिवास्त्र : घ्या भरारी…..

शिवास्त्र :  
घ्या भरारी…..

सुरवात कुठुन केली हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला शेवट कुठे करायचा हे महत्त्वाचे आहे. अँँबसोल्युट झिरो ते सुपर हिरो हा प्रवास फक्त सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रामाणिक प्रयत्न यांचे एन्ड प्रॉडक्ट असतो. करिअर या शब्दाला नवा आयाम देणाऱ्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. आईच्या गर्भात असताना ज्यांच्या करिअरची निवड मातेने केली असं जगातील सर्वोत्तम करिअर डेव्हलपमेंटचं एकमेव उदाहरण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेब.! छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना जिजाऊ मॉसाहेबांनी “तुम्हाला लोककल्याणकारी स्वराज्य स्थापून सार्वभौम छत्रपती राजा व्हायचयं” हे सांगुन करिअरचे स्वप्न सत्यात येऊ शकतं हे जगाला दाखवून दिले. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आगळावेगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या करिअरची वाटचाल करावी.
लो एम इज क्राईम. जगात कधीही कुठेही अशी घटना घडली नाही की एखादा माणूस सकाळी सायकल घ्यायला घराबाहेर पडला आणि संध्याकाळी चुकुन स्प्लेंन्डर घेऊन आला. नाही, वर्ष दोन वर्षांपासून स्फ्लेंन्डर घ्यायचं स्वप्न त्यानं बघितलं म्हणून एकेदिवशी तो स्प्लेंन्डर घेऊन घरी येतो. माणसाचा मेंदू जे ठामपणे ठरवतो ते नक्कीच प्रत्यक्षात येऊ शकतं. हे फक्त वस्तुंच्या बाबतीतच नाही तर करिअरच्या बाबतीत पण शक्य असतं. शिपाई पदाचा इंन्टरव्ह्यू द्यायला गेलो होतो पण चुकुन न्यायाधीश झालो असं कधी होतं का.?
युपी बिहारमध्ये सातवी आठवीची मुलं आयएएस व्हायचं स्वप्न बघतात. आपल्याकडे पदवीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी युवानेता, भावी सरपंच, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणवून घेण्यात धन्यता मानतो. राजकारणापासून दुर रहावे असे माझे अजिबात मत नाही. अभ्यासू व संवेदनशील तरूणांनी राजकारणात यायलाच हवं पण स्वतःच्या सर्व क्षमता तपासून आणि दृढ निश्चयाने.! कुठलाही कौटुंबिक वारसा नसताना केवळ बघितलेल्या स्वप्नामुळे व दृढनिश्चयाने सामान्य चहा विकलेले ग्रहस्थ सलग दोन वेळा थंपिंग मेजॉरिटीने निवडून येत थेट देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात हा भारतात घडलेला इतिहास जगाने अनुभवलाय. मोठं स्वप्न, निष्ठा, दृढनिश्चय, नियोजनबध्द परिश्रम या फॉर्म्युल्याच्या बळावर कोणत्याही क्षेत्रातील करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेता येते. आणि हो – यशाचं क्षितिज नेहमी स्वप्नाळू लोकांचीच वाट बघत असतं…

इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर, नांदेडमास्टर कोच – जवाहरलाल नेहरू लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्लीराष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *