कंधार ( दिगांबर वाघमारे )
कंधार तालुक्यात गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेना सातत्याने काम करत आहे.बातमी सोबतच सामाजिक उपक्रम राबवले जातात. मिर्झा जमीर बेग ही गेल्यात सहा वर्षापासून कंधार तालुका अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांचे काम हे उत्कृष्ट असल्याने त्यांना यावेळीही सर्वांच्या सहमतीने बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर सचिव पदी प्रा. सुभाष वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना वाढण्यासाठी जिल्हा बॉडीने प्रत्येक तालुक्यामध्ये फेर निवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आज दिनांक 5 मे रोजी कंधार तालुक्याच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. कंधार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष सुरेश जोंधळे हे होते तर प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील मोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे अर्धापूर तालुका अध्यक्ष गुणवंत वीरकर हे उपस्थित होते. तत्कालीन अध्यक्ष मिर्झा जमीर बेग यांनी केलेले उत्कृष्ट कार्य लक्षात घेता पुन्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांनी मिर्झा जमीर बेग यांनाच पुन्हा अध्यक्ष करा अशी एकमुखी मागणी केली. यावरून जमिर बेग यांची अध्यक्षपदी तर प्रा. सुभाष वाघमारे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून सूर्यकांत केंद्रे, कार्याध्यक्ष माधव भालेराव, सहसचिव प्रा.भागवत गोरे, सल्लागार हनुमंत मुसळे, संघटक माधव गोटमवाड, कोषाध्यक्ष मोहम्मद सिकंदर, यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून दिगंबर वाघमारे,ए.एल.सरवरी, संतोष कांबळे, मनोज गांजरे, दत्तात्रेय मामडे, यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. दिगंबर वाघमारे यांना जिल्ह्याच्या कार्यकारीत स्थान मिळणार आहे. असल्याचे आश्वासन जिल्हा अध्यक्ष संग्राम मोरे यांनी दिले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. भागवत गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन दिगंबर वाघमारे यांनी केले.


