(नांदेड : दिगांबर वाघमारे )
अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरण व अन्य विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने २० मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातून पाच लाख समाज बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती सकल मातंग समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. नांदेड येथे आज राज्यस्तरीय जनजागारण परिषद घेण्यात आली. दरम्यान, समाजातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, रमेश बागवे, दिलीपराव कांबळे, माजी आमदार अविनाश घाटे, उत्तमप्रकाश खंदारे, लहूजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे, अण्णाभाऊ क्रांती सेना संघटनेचे सचिन साठे, आमदार सुनील कांबळे, आमदार अमित गोरखे, आमदार जितेश अंतापूरकर , सुरेंद्र घोडजकर , आदींची उपस्थतिी होती.
समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. समाजाच्या ब-याचशा मागण्या मान्य झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये देशातील विविध राज्याने स्थापित केलेल्या आयोग आणि समितींचा उल्लेख आहे. त्यात महाराष्ट्रातील क्रांतीवीर लहूजी साळवे अभ्यास आयोग या एक आयोग आणि २१ समितीचा उल्लेख आहे. तसेच क्रांतीवीर लहूजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशीचाही उल्लेख असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना राज्य शासनाला देण्यात आलेल्या आहेत.
सन २००३ ला लहुजी साळवे अभ्यास आयोगाची स्थापना झाली. २००८ ला ते दाखल झाले. २०११ ला आयोगाने सुध्दा मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आरक्षण वर्गीकरण करण्यात यावे, अशी महत्वपुर्ण शिफारास केली आहे. अनूसूचति जातीचे आरक्षण उप वर्गीकरण केले पाहिजे, असे आयोगाने शिफारस केली असतानाही राज्य सरकारने ते नाकारून त्या सरकारने २०११ ला त्यातील ६८ शिफारशी स्वीकारून त्यास तत्वतः मान्यता दिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे आरक्षणाचे उप वर्गीकरण करावे, यासाठी २० मे रोजी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. यात समाजाच्या विविध मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी विनंती करण्यात येणार आहे, अशी संयुक्त माहिती देण्यात आली.सकल मातंग समाजाच्या वतीने मुबई येथे २० मे रोजी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण जन आक्रोश महाआंदोलन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर कुसुम सभागृह येथे माजी आमदार अविनाश घाटे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनजागरण परिषद घेण्यात आली. यावेळी आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर, सचिन साठे, रमेश बागवे, लक्ष्मण ढोबळे, गणपत भिसे, सुरेंद्र घोडजकर, विष्णूभाऊ कसबे, मारुती वाडेकर, उमेश पवळे, आनंद गुंडले, माधव डोमपल्ले, माजी आमदार नामदेराव ससाणे, सतिश कावडे, गणेश तादलापूरकर, पंडित वाघमारे, नारायण गायकवाड, लालबा घाटे , शिवा कांबळे , मारोती मामा गायकवाड आदी उपस्थित होते.
छायाचित्र : सचिन डोंगळीकर


