जय हिंद प्रतिष्ठाण बहाद्दरपुरा कडून रक्तदान करून जयंती साजरी!

कंधार ; प्रतिनिधी


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व नुकतीच झालेली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहाद्दरपुरा येथे जयहिंद प्रतिष्ठाण ने आज दि 14.04.2021 रोजी कालवश आनंद श्रीराम वंजे रक्तदान शिबिर घेऊन जयंती साजरी केली.


सद्यस्थितीत कोरोना च्या आपत्ती मुळे सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्तितीत सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून जय हिंद प्रतिष्ठानने या वर्षीची जयंती रक्तदान शिबिर घेऊन साजरी करण्याचे ठरवले. तसेच शिबिरात रक्तदान करणाऱ्या व उपस्तितांना मास्क व सॅनिटाईजर चे वाटप करण्यात आले.


जय हिंद प्रतिष्ठाण ने मागच्या शिवजयंती च्या वेळी परिसरात कचराकुंड्यांचे वाटप करून जयंती साजरी केली होती. अशा प्रकारे जयहिंद प्रतिष्ठाण नेहमीच महापुरुषांची जयंती व राष्ट्रीय सण लोक उपयोगी उपक्रम राबवून साजरी करत असते, त्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


सदरील शिबिरास परिसरातील प्रतिष्ठितांनी भेटी दिल्या व शुभेच्छा दिल्या . सदरील रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जय हिंद प्रतिष्ठानच्या सर्व युवकांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *