कंधार ; प्रतिनिधी
कंधार अभिवक्ता संघातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती सद्यापणाने साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवक्ता संचाचे अध्यक्ष अड. दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत अभिवक्ता संघाच्या कक्षात सर्वप्रथम डॉ. आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी अड. गायकवाड यांच्यासह सरकारी अभिवक्ता अड. महेश कागणे, सरकारी अभिवक्ता अड. नीरज कोळनूरकर, सहायक सरकारी वकील यु. एम. वाडीकर, अड. यु.पी. वाघमारे, अड. एम. जी. सोनकांबळे, अड. दिलीप कुरुडे, अड. मिलिंद कल्लाळीकर, अड. पी. बी. कदम, अड. हणमंत कुट्टे, अड. सारंग डोंगरजकर, अड. सुहास मस्के, अड. हफीज घडीवाला, नगरसेवक सुधाकर कांबळे, पंचायत समिती सदस्य अड. सत्यनारायण मानसपुरे, दयानंद कदम, मुख्याध्यापक राजहंस शहापुरे, मुकुंद जोंधळे आदी उपस्थित होते.