प्रकाश कौंडगे यांचे निधन

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांचे आज दि.१५ एप्रिल रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

प्रकाश कौंडगे….

ह्या नावातच १९९० च्या शतकात एक दम होता... शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून जी कामगिरी असायला पाहिजे त्याही पेक्षा कईक पट जास्त हा बाळासाहेबांचा शिवसैनिक एक ताकद ठेउन प्रत्येक जनसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर असायचा... सोबतीला असायचे नांदेडचे शिवसेना आमदार कै.प्रकाश खेडकर,संजय जोशी,बिल्लू यादव,बाबुराव केंद्रे, मोहन कारभारी असे कईक शिवसैनिकांची फौज असायची... ही मंडळी रस्त्यावर उतरली तर पोलीस खाते हैराण व्हायचं नव्हे दस्तुरखुद्द पोलीसअधिक्षक भाऊची विनंती करायचे... मग त्यासाठी मातोश्री वरून यावा लागायचा... असा भाऊ होणे नाही... भाऊच्या आदोंलनात सहभागी होण्याचे भाग्य मला खुपदा मिळाले.. कधी नव्हे वारंवार माझ्या खांद्यावर हात ठाकून बोलायचे... कुंटेवार ssssss अन आपले विचार सांगायचे... वर्षा चार वर्षां मतदार संघात यायचे तेव्हा मात्र आठवणीने दोन चार मिनिटे का होईना घरी यायचे बसायचे.. कौतुक करायचे अन निघायचे.. काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील कुठल्यातरी गावात कार्यक्रमासाठी आले होते... फोन केला...गावाबाहेर जाऊन भेटलो.. तीच साद कुंटेवार sss... सहज पंधरा मिनिटे चर्चा झाली त्यानंतर तो आवाज पुन्हा ऐकायला मिळाला नाही....

प्रकाश भाऊ कौडगे व प्रकाश भाऊ खेडकर ही दोन प्रकाश काळाआड गेली… आता तत्कालीन शिवसेनेचा दबदबा आठवला की मन सुन्न होत…


शिवसेनेचा हा ढाण्या वाघ शैवटी भरकटला मात्र शिवसेनेची धार कायम होती… भाऊ अलविदा….
भावपूर्ण श्रद्धांजली…

शंब्दाकन

गणेश कुंटेवार,शिवसैनिक ,कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *