कंधार ; प्रतिनिधी
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता मोहीजा गावातील नागरीकांना येथिल सामाजिक कार्यक्रते नागनाथ नाथराव मोहजकर व त्यांच्या पत्नी तथा
ग्रामपंचायत सदस्या महानंदा नागनाथ मोहजकर यांच्या पुढाकाराने आज दि.१५ एप्रिल रोजी मँस्कचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मोहजकर परीवार हे दापंत्य उच्च विद्याविभूषीत असून नेहमीच सामाजिक कार्यासाठी सदा अग्रेसर असतात.दि.१५ एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या औचीत्याने अनावश्यक खर्च टाळून त्यामध्ये आपल्या गावक-यांसाठी कोरोना काळात मदत करण्यासाठी सर्वांना मास्क चे वाटप आपल्या परीवाराच्या वतीने करत एक चांगला आदर्श घालून दिला. मोहजकर यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.