राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


नांदेड:भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व प्रतिमेचे पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.


यावेळी नांदेड मनपा चे माजी विरोधी पक्षनेते जीवन पा. घोगरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष डी. बी. जांभरूनकर,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष बी. बी. माठोरे, सेवादल शहराध्यक्ष गोविंद यादव,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रियांका कैवारे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, मुखेड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. श्रीपती पवार,राष्ट्रवादी अर्बन सेल जिल्हाध्यक्ष विकास वैद्य,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *