नांदेड – प्रकाश कौडगे यांनी नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच सकारात्मक भूमिका वठवली होती. सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, हा त्यांचा स्थायी भाव होता. अनेक वर्ष शिवसेनेत त्यांनी काम केले. त्यांचे आणि माझे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. अलिकडल्या काळात जरी ते इतर पक्षात काम करीत असले तरीही मुळात त्यांचा पिंड शिवसैनिकाचा होता. त्यांच्या निधनाने आपण एका लढवय्या कार्यकर्त्यास गमावलो आहोत, अशी भावना व्यक्त करत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.