हानमंतराव पाटिल भुत्ते यांचे निधन

कंधार (प्रतिनिधी)

तालुक्यातील उमरज येथील प्रतिष्ठित नागरीक हानमंतबाबाराव पाटिल .भुत्ते वय ५४ वर्ष यांचे दि.१४ एप्रिल रोजी रात्री १०.३० वा उमरज येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले,१ मुलगी,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे तिन्हीही मुले भारतीय सैन्यदलात देश सेवेसाठी कार्यरत आहेत.१५ एप्रिल रोजी उमरज येथील त्यांच्या शेतात सकाळी ११.०० वा.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करणत आले.यावेळी नातेवाईक व मिञ परीवार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.हानमंत पाटिल भुत्ते हे कंधार तालुका भा.ज.पा.सरचिटणीस तथा पञकार संघाचे तालुका उपाध्यक्ष विनोद पाटिल तोरणे यांचे मामा होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *