कंधार ; प्रतिनीधी
जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर यांनी लॉकडाऊनचे नियम तोडणा-यांची गय न करता दंड लावण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.त्यामुळे आज दि.१९ एप्रिल रोजी कंधार नगरपालीकेचे मुख्याधिकारी विजय चव्हाण यांनी शहरातील १४ दुकानाला शिल्ल ठोकले असून सोमवारी असणारा आठवडी बाजारही दुपार नंतर उपविभागीय अधिकारी बोरगावकर यांच्या पथकाने उठवला आहे.
कंधार नगरपालीकेचे मुख्याधिकारी विजय चव्हाण यांच्या पथकाने आज दि.१९ एप्रिल रोज सोमवार आठवडी बाजाराला दुपार नंतर बाजार उठवण्याच्या सुचना दिल्या होत्या.तरीही बाजारातील वाढती गर्दी लक्षात घेवून बाजार उठवला .
तसेच शहरातील काही दुकानदारलॉकडाऊनचे नियमाला बगल देवून आपली दुकाने चालू ठेवून लपून छपून व्यवहार चालुच ठेवला होता व नियमाचे उल्लंघन केले होते.अशा १४ दुकानावार छापे टाकून दुकानांना शिल्ल ठोकण्याची कार्यवाही विजय चव्हाण व त्यांच्या पथकानी केली आहे.