श्रीसंत नामदेव महाराज संस्थान उमरजचे मठाधिपती संत एकनाथ नामदेव महाराज यांच्या हस्ते कंधार येथिल कोव्हीड सेंटरला सँनिटायझर,मॉस्क हँण्डगोल्जची भेट ;कंधार येथिल नामदेव महाराज सभागृह कोव्हीड सेंटरसाठी देणार

कंधार ;प्रतिनिधी

मिनी पंढरपूर म्हणून परिचित असलेले कंधार तालुक्यातील उमरज संस्थान कोरोना महामारी काळात पेशन्ट व डॉक्टरांसाठी धावून आले आहे. श्री संत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती श्री संत गुरु एकनाथ नामदेव महाराज यांच्या हस्ते कंधार येथिल कोव्हीड सेंटरला १९ एप्रिल रोजी सॅनिटायझर, मास्क व हॅन्डग्लोज ची भेट देण्यात आली .तसेच पुढे गरज पडल्यास कंधार येथिल नामदेव महाराज सभागृह कोव्हीड सेंटरसाठी उपलब्ध करुन देणार असल्याची माहीती यावेळी श्री संत गुरु एकनाथ नामदेव महाराज यांनी दिली.

दि.१९ एप्रिल रोजी संत एकनाथ महाराज मठाधिपती यांनी कंधार येथील कोव्हीड सेंटरला भेट देऊन पाहणी केली असता त्यांना तेथील डॉक्टर व रुग्णांसाठी आवश्यक असणारी सँनिटायझर,मास्क नसल्याचे लक्षात आले. तेव्हा तात्काळ २५ लिटर सानीटायझर,१०० मास्क,१०० हॅन्डग्लोज ची भेट देऊन कोव्हीड सेंटर मध्ये असणाऱ्या रुग्णांना न घाबरण्याचे घेण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉक्टर संतोष पदमवार सह त्यांचे पथक उपस्थित होते.

कंधार येथिल नामदेव महाराज सभागृह कोव्हीड सेंटरसाठी देणार

कोरोनाचा वाढता संसर्ग व रुग्णसंख्या पाहता प्रशासनास सोईचे जावे आणि कंधार तालुक्यातील रुग्णावर कंधार येथेच कोरोनावर उपचार करता यावा म्हणून कंधार येथिल कोव्हीड सेंटरच्या बाजुस असणारे उमरज संस्थानाचे संतशनामदेव महाराज सभागृह नविन तात्पुरते स्वरुपाचे कोव्हीड सेंटर उभारण्यासाठी प्रशासनास उपलब्ध करुन देण्यात येणार असून तेथे लागणारी आवश्यक मदत करणार असल्याची माहीती यावेळी पत्रकारांशी दिली.तसेच मुख्याधिकारी नगरपालीका विजय चव्हाण,तहसिलदार व्यंकटेश मुंडे,ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सुर्यकांत लोणीकर यांच्याशी या विषयी बोलणे झाल्याची ही माहीती यावेळी संत एकनाथ नामदेव महाराज यांनी दिली.

यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,संभाजी गडंबे, प्राध्यापक सुभाष वाघमारे ,विनोद पाटील तोरणे,एस.पी. केंद्रे ,माधव भालेराव आदी सह पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *