लोहा व कंधार येथे स्वतंत्र ऑक्सिजन जनरेशन प्लान्टची आमदार श्यामसुंदर शिंदे यांची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी

कंधार ; प्रतिनिधी


मंत्रालय मुंबई येथे काल सोमवारी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार राजेश टोपे यांची भेट घेऊन लोहा-कंधार मतदार संघात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त करत मतदारसंघात ऑक्सिजनचा होणारा तुटवडा लक्षात घेता लोहा व कंधार येथे दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांट ला मंजुरी देण्याची मागणी आ. शिंदे यांनी केली होती.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या ऑक्सीजन जनरेशन प्लांट च्या मागणीला तात्काळ मंजुरी देत नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना लोहा व कंधार येथे तात्काळ स्वतंत्र दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्या संदर्भात सूचना केल्या.

लोहा व कंधार मतदार संघातील कोरोनाच्या रुग्णांना या ऑक्सिजन जनरेशन प्लांट्चा मोठा लाभ होणार आहे. लोहा व कंधार तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने या वरील उपाय योजना ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा अशा महत्त्वपूर्ण विषयावर आमदार शिंदे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोहा व कंधार तालुक्यात रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही व रेमडेसीविर इंजेक्शनचा मुबलक पुरवठा लोहा व कंधार तालुक्यात करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ निर्देश दिले असल्याचे आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले ,गेल्या वर्षी मार्च एप्रिल मध्ये कोरोना च्या संकट काळात आमदार शिंदे यांनी आपल्या आमदार निधीतून लोहा व कंधार तालुक्यासाठी दोन नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या.लोहा-कंधार मतदार संघात गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटात सामाजिक दायित्व जपत कर्तव्यदक्षपणे आ. शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी गोरगरिबांना मोफत जेवनाचे वाटप, अन्नधान्य किट चे वाटप ,मास्क, सॅनिटायझर व पीपीई किटचे वाटप आमदार शिंदे व आशाताई शिंदे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या संकटात मतदारसंघातील हजारो नागरिकांना वाटप करून मतदारसंघातील गोरगरिब जनतेला धीर दिला होता,

आ. शामसुंदर शिंदे हे सदैव कर्तव्यदक्ष पणे सामाजिक दायित्व जपत कोरोनाच्या संकटात लोहा ,कंधार मतदार संघातील आरोग्य यंत्रणा सक्षम व बळकट करण्यासाठी वेळोवेळी तळमळीने प्रयत्न व पाठपुरावा करत असून आमदार शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला वेळोवेळी यशही येत असल्याने आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या रूपाने लोहा-कंधार मतदार संघाला एक कर्तव्यदक्ष,सदैव सामाजिक दायित्व जपणारा कर्तव्यदक्ष आमदार मिळाला असल्याचे लोहा -कंधार मतदारसंघातील जनतेतून बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *