लोहा ;शिवराज दाढेल लोहेकर
कोविड-१९ कोरोना जागतिक महामारीने संपुर्ण देशाला व जगाला अक्षरशः हादरून सोडले.राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होतआहे.कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर असून अशा संकट काळात लोकांच्या आरोग्याचा विचार करता कोरोना पासून बचाव करण्यासाठी लोहा येथे बुलडाणा अर्बन बँक पुढे आली. एक सामाजिक दायित्व म्हणून बुलडाणा अर्बन बँक लोहाच्या वतीने शासकीय उपजिल्हा रुग्णालय/कोवीड सेंटर लोहा येथे कोरोना रूग्ण व नातेवाईकांना N95 मास्कचे वाटप करण्यात आले.
बुलडाणा अर्बन बँके ही सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असते.अनेक अंब्यूलन्स द्वारे रूग्ण सेवा, अनेक बेवारस प्रेतांचे अंत्यसंस्कार, शेतकरी व्यापारी सामान्य जनतेची सेवा करण्यात अनेकांना तात्काळ गोल्ड लोन, तारण लोन देवून अडचण भागवली जाते.अनेकदा सामाजिक उपक्रम राबवून समाजात नेहमीच समाजमनावर वेगळा ठसा निर्माण केलेला आहे.
आज दि.२३ रोजी लोहा कोविड सेंटर मध्ये “रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” समजून N95 मास्क चे वाटप करण्यात आले. बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष या.श्री.राधेश्यामजी चांडक(भाईजी),चिफ मैनेजींग डायरेक्टर डॉ.सुकेशजी झंवर, यांच्या मार्गदर्शनाखाली लोहयाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, आरोग्य अधिकारी डॉ.मुंडे, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, बुलडाणा अर्बन चे पालक संचालक श्री. सुबोधजी काकाणी शेट,रोशनजी अग्रवाल विभागीय व्यवस्थापक डॉ.काळे, डॉ.सुर्यवंशी, यांच्या हस्ते सर्व कर्मचारी प्रशांत सिरसाठ, सचिन जाधव,श्रृंगारे, धुमाळ यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.यावेळी बुलडाणा अर्बन बँक लोहा चे शाखा व्यवस्थापक के.एम.शेटे,राजु जैन, ओमप्रकाश सोनवळे,अक्षय माळोदे, प्रविण कदम, अंकूश गीते आदी कोरोनाच्या नियमांचे पालन करून उपस्थित राहून मास्क वाटप कार्यक्रम घेण्यात आला.