अखेर कंधार शहरातील व्यंकटेश नगर मधील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरु ; परशुराम केंद्रे यांनी केला होता पाठपुरावा

कंधार ; प्रतिनिधी

कोणतेही सामाजिक कार्य करण्यासाठी पद अथवा राजकारणात उच्च पदस्थ असावे असे काही गरजेचे नाही केवळ ईच्धा शक्ती असावी लागते .कंधार येथिल सामाजिक कार्यक्रते अशी ओळख असलेल्या

परशुराम केंद्रे यांनी आपल्या नगरातील लोकांच्या समस्या चा पाढा मुख्याधिकारी नगरपालीका यांच्या समोर मांडला आणि त्याची दखल घेवून दि.२३ एप्रिल रोजी व्यंकटेश नगर मधील पाण्याच्या प्रश्न मार्गी लागला.

नळाला पाणी बारीक येत आहे.असे व्यंकटेश नगर मधील नागरिकांच्या समस्या होत्या. त्या नागरिकांच्या समस्या परशुराम केंद्रे घेवुन तात्काळ कंधार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन.व्यंकटेश नगर मधील नागरिकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी लगेच आज दि.23/04/2021.कामाला सुरुवात केली आहे. आता व्यंकटेश नगर येथील प्रत्येक नागरिकांच्या घरात नळाला पाणी समाधान कारक येणार असल्याने अनेकांनी या कार्याबद्दल परशुरामचे कौतुक केले.तर भावी नगरसेवक म्हणून अनेकांच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *