जीवनाची किंमत दर्शवितांना, सर सलामत तो पगडी पचास! कोरोना काळी मुहावरा शोभतो, घरी लाॅकडाउन राहिल्याने खास! संक्रमित झाल्याने दवाखान्यात, लाखों किंमतीचा श्वासोच्छ्वास! माझे अस्तित्व डोईवर दिसल्याने, रुबाबदार व्यक्तीमत्व रे झकास! संकट काळावर मात केल्याने, तुमचा हेवा वाटेलच कासवास! मुखी मास्क न लावता फिरल्याने, मानवबाळा होशील तू खल्लास! मी संख्येने पचास नसून लाखों, फक्त तू सलामत राहावे ही आस! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारी, हा संदेश शब्दातून मांडला खास!