नांदेड/प्रतिनिधी
कोरोना आजारामुळे नागरीक त्रस्त आहेत त्यामुळे कोरोनावरील प्रभावी इंजेक्शन रेमडेसिवीर रूग्णांना त्वरीत उपलब्ध करून द्यावेत तसेच ऑक्सिजनचा पुरवठा रूग्णांना उपलब्ध व्हावा, कोरोना बाधित रूग्णांना प्रभावी आरोग्य सेवा पुरवाव्यात तसेच कोरोना प्रतिबंधासाठी कोरोनाची लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून बंद पडलेली लसीकरण केंद्र त्वरीत सुरू करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्याकडे निवेदन देवून केली आहे.
नांदेड शहरात आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचा उद्रेक झालेला आहे. प्रशासन या बाबीकडे म्हणावे तेवढे लक्ष देत नाही त्यामुळे कोरोना बाधित रूग्ण त्रस्त झालेले आहेत. कोरोनावरील प्रभावी इंजेक्शन रेमडेसिवीर उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना जिव गमवावा लागत आहे. यावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून कशा पध्दतीने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत आणि कोरोना बाधित रूग्णांना हे इंजेक्शन त्वरीत उपलब्ध करून द्यावेत. तसेच कोरोना आजाराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पध्दतीने व्हावा. ऑक्सिजनच्याअभावामुळे कोणत्याही रूग्णांचा जिव जावू नये यासाठी प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेवून योग्य ती कारवाई करून मुबलक प्रमाणात कोरोना बाधित रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा. तसेच कोरोना बाधित रूग्णांना या व इतर औषध आणि इंजेक्शनचा पुरवठा कसा करता येईल याबाबतही प्रशासनाने सतर्क रहावे आणि कोरोना बाधित रूग्णांना आरोग्य विषयक सुविधा त्वरीत पुरवाव्यात तसेच बंद पडलेले कोविड लसीकरण केंद्र पुर्ववत सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना निवेदन देवून केली आहे. निवासी जिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनाही मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, सरचिटणीस डी.बी.जांभरूनकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, प्रा.एन.आय.खेळगे, बाळासाहेब भोसीकर यांची उपस्थिती होती.