लातूर : आपला जीव धोक्यात घालून अत्यंत तुटपुंज्या वेतनात काम करणारे जिल्ह्यातील NRHM अंतर्गत कर्मचाऱ्यांची प्रशासनाच्या चुकीमुळे हेळसांड होत आहे.
सविस्तर वृत्त असे की , गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत असणारे NRHM अंतर्गत जनतेला आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचार्यांना महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार मानधनात 10% वाढ देण्यात आली होती, ती वाढ राज्यातील इतर जिल्ह्यातील सर्व कर्मचार्यांना देण्यात आले आहेत मात्र लातूर जिल्ह्यातील प्रशासनाच्या चुकीमुळे व दुर्लक्षामुळे 1 वर्ष झाले तरी 10% ची मानधन वाढ एरीयस अद्याप पर्यंत दिले नाहीत , यामुळे जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची प्रशासनातर्फे हेळसांड होत आहे.. सध्याच्या महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना शासनाने कायम सेवेत करून घ्यायला पाहिजे पण ते तर सोडाच राज्य शासनाने दिलेले वाढ सुद्धा लवकर दिली जात नाही , आणि कुठला कर्मचारी याबाबत आवाज उचलत असेल तर त्यांची मुस्कटदाबी केली जाते. तरी जिल्हा आरोग्य प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर लक्ष घालून सदरची वाढ झालेली 10% रकमेचे एरियस लवकर देऊन होत असलेली हेळसांड थाम्बवण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे..