कंधार शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र चालू करा – भाजपा ची मागणी


कंधार: प्रतिनिधी


कोरोना काळात देशभरात कोविड १९ वरील लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहे त्या अनुषंगाने १मे पासून १८वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे,कंधार शहरातील प्रत्यक प्रभागात ही लसीकरण केंद्र चालू करावीत अशी मागणी भाजपा कंधार शरारध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी निवेदन तहसीलदार कंधार यांना केली आहे.


केंद्र सरकारच्या वतीने पहीला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हँक्सिन चा देण्यात येत आहे ,१मे पासून १८वर्षा वरील नागरिकांना हे लस देण्यात येणार आहे त्यामुळे शहरातील एकमेव लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो म्हणून शहरातील प्रत्यक प्रभागात लसीकरण केंद्र चालू करावे किंवा एका प्रभागात दोन दिवस लसीकरण करावे व त्या त्याची माहिती नागरिकांना द्यावी, जने करून गर्दी होणार नाही तसेच दुसरी लस घेणारे जेष्ठ नागरिक यांची स्वतंत्र व्यवस्था करावी,त्याच बरोबर लसीकरण नोंदणी साठी ऑनलाइन प्रणाली वापरली जात आहे ही नोंदणी संगणकावर केली जाते त्या मुळे बराच वेळ ताटकळत बसावे लागते त्या मुळे संगणका बरोबर मोबाईल ऍप ने करावी म्हणजे वेळ लागणार नाही.

अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार, कंधार,जिल्हाशैल्य चिकित्सक नांदेड, वैधकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय कंधार यांना भाजपा शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी दिले.यावेळी भाजपा सरचिटणीस मधुकर प डांगे ,अड सागर डोंगरजकर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *