लोहा ; शैलेश ढेबंरे
बेरळी येथील शंभू महादेवाची दरवर्षीप्रमाणे यात्रा भरत असते परंतु यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर असणारी यात्रेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले व महादेवाची काठी मोजक्या गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शंभू महादेवाच्या मंदिरा पर्यंत मिरवणूक नेण्यात आली.
यावर्षी कोरोना चे सर्व नियमांचे पालन करून महादेवाची काठी मंदिरापर्यंत घेण्यात आली व यात्रेतील संपूर्ण कार्यक्रम सप्ताह, महाप्रसाद रद्द करण्यात आला. यावेळी साई बोरवेल चे मालक संभाजी पाटील ढेंबरे ,गावचे सरपंच संदीप होळगे, चेअरमन भुजंगराव होळगे, धोंडू होळगे, पत्रकार शैलेश ढेबंरे, काठी चे मानकरी मारुतराव आनंदा ढेबंरे ,गजानन ढेबंरे, माहराज भिमाशंकर, स्वामी शंकर गिरी आदी मोजक्या गावकरी मंडळींची उपस्थिती होती.