एकीकडे ऑक्सिजनसाठी हतबल झालेला माणूसच करतोय झाडांची कत्तल…झाडे लावा , झाडे जगवा ला खीळ बसून झाडे तोडाला च आलाय ऊत…

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

झाडे लावा , झाडे जगवा या मोहिमेत शासन प्रचार , प्रसार करत प्रयत्नांची पराकाष्ठा करून मानव जातीला जागरूक करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करत आहे. तर दुसरीकडे कोरोना ने सर्वत्र हाहाकार घातल्यामुळे ऑक्सिजन मिळवण्यासाठी हतबल होत तडफडून रोज जीवच्या जीव गतप्राण होत आहेत , अशी गंभीर परिस्थिती असतानाही मानव जात जागृत व्हायला तयार नसून ग्रामीण भागात दररोज उभ्या झाडांच्या कत्तलीवर कत्तली होत असून राजरोसपणे तोडलेल्या लाकडांची उघडपणे वाहतूकही केली जात आहे . असे असतानाही वन विभाग मात्र कुंभकर्ण झोपेत आहे का झोपेचं सोंग घेतेय हा सामान्य माणसाला प्रश्न पडला असून याला कोणीतरी आवर घालेल का ? असा सवाल जनतेतून केला जात आहे.

सध्या ची परिस्थिती दिवसेंदिवस दिवस बदलत चालली असून पृथ्वीतलावरील प्रत्येकालाच आपापला जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रत्येक दवाखान्यात कृत्रिम ऑक्सिजन वेळेवर मिळत नसल्यामुळे आजघडीला दररोज कित्येक जीव गतप्राण होत आहेत , हे सर्व आपण दररोज पाहतोय , वाचतोय , अनुभवतोय सुद्धा याबद्दल शोशल मीडिया , प्रिंट मीडिया सदैव मानवाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे तरीपण यातून आणखीन तरी काहीच शिकत नाही.

दुसरीकडे शासन वृक्ष लागवड चा अजेंडा हाती घेऊन प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावून त्याचे योग्य संगोपन करावे असा संदेश देत झाडे लावा , झाडे जगवा या उपक्रमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून विविध स्तरावर अनेक अभियान राबवत जनजागृती करत वृक्ष लागवडीसाठी परावृत्त करत आहे. परंतु मानव काही केल्या जागृत व्हायला तयारच नाही.

सद्यस्थितीला ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून होत असलेली वाहतूक पाहता एकीकडे शासन वृक्ष लागवड साठी प्रयत्नशील असतानाच होत असलेली वृक्षतोड कशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिसत नाही ? का ते झोपेचं सोंग घेत स्वतःची पोळी लाटून घेत आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *