नांदेड : कोरोना काळात रुग्णाना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत.
नांदेड़ जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सुकर व्हावी यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या एस डी आर एफ फंडातून तब्बल 52 रुग्णवाहिका नांदेड जिल्ह्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत .
त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रूग्णसेवेला अधिक बळकटी मिळणार असून रुग्णांना अधिकाधिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.