नांदेड ; प्रतिनिधी
तिसऱ्या लॉकडाऊनच्या सोळाव्या दिवशी लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व नांदेड अन्नपूर्णा तर्फे ३०० डबे वितरीत करण्यात आले असून आतापर्यंत ५४०० डबे गरजूंना देण्यात आले असल्याची माहिती लॉ.संजय अग्रवाल,
संयोजक धर्मभूषण लॉ. ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
शुक्रवारच्या तीनशे डब्या मध्ये कै. रमेशसिंह तेहरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रितेशसिंह तेहरा यांनी दीडशे डबे,सिद्राम सूर्यभान दाडगे विश्वेश्वरया काॅलनी १०० डबे,,शलाका क्यातमवार वसमत यांच्यातर्फे ५० डब्यांचे योगदान आहे. नवीन नोंदणी करणाऱ्यामध्ये
विजय घोगरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त १ मे रोजी तीनशे डबे,सौ.रेवती व अनुदत्त रायकंठवार बिलोली यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ३ मे रोजी ५१ डबे देणार आहेत.ईश्वरचंद जैन सावजी, मुकेशकुमार अग्रवाल, युनय हर्ष अग्रवाल पडपिता बनारसीदास अग्रवाल भैय्याजी यांच्यातर्फे प्रत्येकी १०० डब्यांची नोंदणी झाली आहे.
कै.सौ.मीराबाई बाबुराव कवानकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौ.रूपाली बालाजी कवानकर यांच्याकडून ,सौ धनश्री व दत्तात्रय देव चंद्रकांत नागोराव जोशी यांच्यातर्फे प्रत्येकी ५० डबे देण्यात आले आहेत. शुक्रवारी डबे वाटण्यासाठी रितेशसिंह तेहरा,राजा तेहरा, साहेबराव ढोले ,ललित परदेशी, अमरजीतसिंग चौधरी ,विनोदसिंह रावत, मन्मत स्वामी,राजेशसिंग ठाकूर यांनी परिश्रम घेतले.