कंधार ; प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे.त्यामुळे १ मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावरील रद्द करण्यात आले.परंतु कंधार तालुक्यातील मोहीजा परांडा येथिल ग्रामपंचायतीच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांना मॉस्क वाटप करण्यात आले.
यवेळी मोहीजा परांडा येथिल सरपंच प्रतिनिधी मारोती भिमराव गायकवाड , उपसरपंच तानाजी मनोहर पाटील वळसंगे, सदस्या प्रतिनिधी नागनाथ नाथराव मोहजकर , पांडुरंग पाटील कदम यांनी मॉस्क वाटपासाठी पुढाकार घेतला होता.